सिल्लोड, (प्रतिनिधी): आई वडील म्हणतात म्हणून नाही तर शिक्षण घेत असताना आपली दिशा निश्चित करण्यासाठी क्षमतावृती सर्वात महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी तालुक्यातील माणिकनगर येथील श्री सिद्धिविनायक मुलींचे वसतिगृहात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले.
माणिकनगर (ता. सिल्लोड) येथील मंगळवारी दुपारी श्री. सिद्धिविनायक मुलींचे वसतिगृहातील निवासी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ठाकरे म्हणाले की, सर्व संधी जरी उपलब्ध असल्या अन् तुमची इच्छाशक्ती नसेल तर स्वप्ने पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थी दशेतच तुम्ही शिस्त अभ्यास, मेहनत अंगीकारली पाहिजे.
तसेच आपली क्षमता ओळखून त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पार पाडा व ज्या क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचे असेल त्याबद्दल प्राथमिक क्षेत्राची माहिती, अभ्यास महत्त्वाचा असल्याचा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिला. या वेळेस रवींद्र ठाकरे यांनी वसतिगृहातील निवासी विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सोयी सुविधा, सुरक्षिततेच्या व्यवस्थेची पाहणी देखील केली.
यावेळी सोयी-सुविधा पाहून भारावून गेले. कार्यक्रमाच्या वेळी वसतीगृहातील उपस्थित विद्यार्थिनी ठाकरे यांना स्पर्धात्मक परिक्षाबाबत प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना त्यांनी सोप्या आणि सध्या पद्धतीने उत्तरे दिली. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा कलावती बोराडे, उपाध्यक्ष संतोष बोराडे, संस्थेचे सचिव सुनिल बोराडे, वसतिगृह अधिक्षिका मनीषा बिडवे, विद्या छडीदार तसेच दीपक पाटील, पंडित फुले, भिकन सतुके आदी पोलीस कर्मचारी व वसतीगृहातील २४ विद्यार्थिनी उपस्थित होते.










